
रोहित शर्माने रविवारी (19 जुलै) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करत अनेक विक्रम रचले आहेत. लॉर्ड्सवर खेळला गेलेला हा सामना भारताने गमावला असला तरी चर्चा मात्र रोहितच्या शतकाची सुरूच
आहे. त्याने 138 धावांची खेळी करत लॉर्ड्सवर वनडेमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय होण्याचा मान पटकावला. त्याचबरोबर तो SENA देशांमध्ये शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली काय सचिन तेंडुलकरही खूप मागे आहे.
क्रिकेट वर्तुळात SENA म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश. या देशांच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही, मात्र रोहितने ते सोपे करून दाखवले आहे. त्याने लॉर्ड्सवर शतकी खेळी केल्याने त्याचे SENA देशांमध्ये 15 वे शतक पूर्ण झाले आहे. त्याबरोबरच तो SENA देशांमध्ये सर्वाधिक वनडे शतके झळकावणारा आशियाई ठरला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी विराट आहे.
विराटने SENA देशांत वनडेमध्ये केवळ दहा शतके केली आहेत. यामध्ये श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसूर्याही आहे. त्यानेही दहा शतके केली आहेत. कुमार संगकारा या आणखी एका श्रीलंकाच्या दिग्गजाचा समावेश असून त्यानेही दहा शतके झळकावली आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर एक स्थान खाली आहे.
सचिनने SENA देशांमध्ये केवळ 9 वनडे शतके केली आहे. 8 शतके करत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली पण या यादीत आहे. शिखर धवनने मात्र धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने SENA देशांमध्ये तब्बल 8 शतके केली आहेत. या यादीत पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही.
SENA देशांमध्ये सर्वाधिक वनडे शतके झळकावणारे आशियाई फलंदाज-
15* – रोहित शर्मा
10* – विराट कोहली
10 – सनथ जयसूर्या
10 – कुमार संगकारा
9 – सचिन तेंडुलकर
8 – सौरव गांगुली
8 – शिखर धवन
इंग्लंड-भारत मालिका
इंग्लंड दौऱ्यात भारताने वनडे मालिकेची सुरूवात चांगली केली होती आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसरा सामना जिंकत यजमान संघाने मालिका बरोबरीत आणली. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताला 388 धावसंख्येचे लक्ष्य दिले होते, जे रोहितचे शतक आणि विराट-शुबमन गिलच्या अर्धशतकानेही भारताला पार करता आले नाही.
भारताने तिसरा सामना 27 धावांनी गमावला आणि मालिकाही गमावली.














