जगातील राहण्यायोग्य चांगल्या शहरांची यादी समोर आली आहे. या आठवड्यात ‘द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट’ ने ‘ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026’ रिपोर्ट जारी
केला आहे. या यादीत एकूण 173 शहरांची यादी आहे. शहरातील विविध सुविधा आणि राहणीमानाचे निकष लावून ही यादी तयार करण्यात आलेली नाही. भारतातील दिल्लीने या यादीत 120 वा क्रमांक मिळवला आहे. तर डेन्मार्कचे कोपेनहेगन शहर हे जगातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला मागे टाकत कोपेनहेगनने पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. ही यादी तयार करताना शहरातील शिक्षण, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा, संस्कृतीचाही विचार करण्यात आला आहे.
भारतीय शहारांचा देखील यादीत समावेश आहे. भारतातील नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू या शहरांचा या यादीत समावेश आहे.
नवी दिल्ली : 120
मुंबई : 121
चेन्नई : 123
बंगळुरू : 127
यंदा भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईच्या क्रमवारीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. रिपोर्टनुसार, कोपेनहेगन शहरात स्थिरता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहेत. तसेच शहरातील संस्कृती, पर्यावरण, सार्वजनिक सेवा चांगल्या असल्याने शहराने अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. टॉप दहा शहरात अमेरिकेच्या फक्त एकच शहराने स्थान मिळवलं आहे. कॅनडाचे वँकूवर शहराने 9 वा क्रमांक पटकावला आहे. अमेकिरेचे न्यूयॉर्क शहर हे तिसऱ्या क्रमांकावरून 66 व्या क्रमाकांवर पोहोचले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि दहशतवादी घटनांमुळे क्रमवारीत घसरण होते. तर होनोलुलु शहर हे जागतिक क्रमवारीत 2 अंकानी घसरल्यानंतरही अमेरिकीतील राहिण्यायोग्य शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकांचं शहर ठरलं आहे.
खरंतर पश्चिम युरोपमध्ये जगातील सर्वात राहण्यायोग्य प्रदेश राहिला आहे. दुसरीकडे आशियातील शहरांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. 2025 च्या तुलनेत दहा चिनी शहरांनी क्रमवारीत सुधारणा केली आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धामुळे यादीवर परिणाम झाल्याचेही यादीत नमूद करण्यात आलं आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धामुळे व्यापाऱ्यावर परिणाम झाल्याने काही देशांची क्रमवारीत घसरण झाली, असेही यादीत नमूद करण्यात आलंय.













