FIFA World Cup 2026 Ferran Torres story : संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (FIFA World Cup 2026) स्पेन (Spain) पुन्हा
एकदा जगज्जेता ठरला आहे. अर्जेन्टिनाला (Argentina) हरवून स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर (FIFA World Cup 2026 News) नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात स्पेनची अर्जेन्टिनावर 1-0 अशा गोलफरकानं मात करत तब्बल 16 वर्षांनी स्पेननं पुन्हा फिफा विश्वचषक जिंकला आहे. अत्यंत चुरशीचा रंगलेल्या या सामन्यात पूर्ण वेळेपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मग, अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात, म्हणजे 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने (Ferran Torres) स्पेनसाठी गोल केला आणि स्पेननं बलाढ्य अर्जेन्टिनाला हरवून दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
मात्र हा सामन्यातील एकमेव गोल होता, ज्याने सामन्याचा निकाल निश्चित केला. पण कदाचित तुम्हाला तुम्हाला माहित नसेल की, अंतिम सामन्यात एकमेव गोल करणाऱ्या टोरेसची ही दैदिप्यमान कामगिरी इतकी सहज सोपी नव्हती, त्याचा प्रवासही तितकाच खडतर होता. त्याने वयाच्या 6व्या वर्षी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्याचे आजोबा या स्पॅनिश खेळाडूचे पहिले प्रशिक्षक होते. चला तर मग फेरान टोरेसच्या फुटबॉल क्षेत्र आणि त्याच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊया
Ferran Torres story : वयाच्या 6व्या वर्षी आजोबा बनले प्रशिक्षक आणि घरचा कुत्रा बनला गोलकीपर
फेरान टोरेसचा जन्म व्हॅलेन्सियामधील एका गावात एका सामान्य कुटुंबात झाला होता. असे म्हटले जाते की, त्याचे संगोपन प्रामुख्याने त्याच्या आईने केले. फेरान अनेकदा त्याच्या आजोबांबद्दल बोलताना ऐकू येतो. तो म्हणतो की त्याच्या आजोबांनीच त्याला खेळातील सर्व बारकावे शिकवले. फेरानने वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला तो आपल्या कुत्र्याला गोलकीपर म्हणून वापरायचा. तो कुत्र्यासमोर गोल करण्याचा सराव करायचा, जे अनेकदा कठीण असायचे. अशाप्रकारे त्याचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर तो एका फुटबॉल अकादमीमध्ये दाखल झाला. हळूहळू, त्याने प्रगती केली आणि 2020 मध्ये स्पेनसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
FIFA World Cup 2026 : अंतिम सामन्यातील सामनावीर
दरम्यान, 26 वर्षीय फेरान टोरेस याला अंतिम सामन्यात एकमेव गोल केल्याबद्दल सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने कोणतीही चूक केली नाही. टोरेसची सुरुवातीच्या अकरा खेळाडूंमध्ये निवड झाली नव्हती. तो सामन्याच्या 61 व्या मिनिटाला मैदानात उतरला आणि संघासाठी सामनावीर ठरला.
हे सुद्धा वाचा:
- FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं











