नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीकडून नवी दिल्लीत जंतरमंतर ते संसद भवन असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्यानं
उपोषण सुरु ठेवणार असल्याचं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे. रुग्णालयातून एका टिशू पेपरवर संदेश लिहून सोनम वांगचुक यांच्या एक्स खात्यावरुन पोस्ट केली आहे. वांगचुक यांनी 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.
सोनम वांगचुक काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांनी म्हटलं की उपोषण सुरु ठेवणार आहे. शांततापूर्ण मार्गानं विरोध करणाऱ्या युवकांसोबत ज्या प्रकारे क्रूर पद्धतीनं वागण्यात आलं ते पाहता उपोषण सुरु ठेवत असल्याचं वांगचुक म्हणाले. जोपर्यंत युवकांच्या नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचं वांगचुक यांनी म्हटलं.
शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी
सोनम वांगचुक म्हणाले की मला त्यांना रुग्णालयात भेटण्याची परवानगी आहे. मात्र, सरकारनं प्रथम शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. युवकांना उकसवण्यात आल्यानंतर देखील त्यांना शांतता बाळगली, यामुळं मी खूप प्रभावित झालो आहे. मी सरकार आणि पोलिसांना विनंती करत त्यांनी आज किंवा उद्या संसदेसमोर त्यांच्या तक्रारी मांडण्याची परवानगी द्यावी आणि हा मुद्दा सोडवावा, असं सोनम वांगचुक म्हणाले. युवा आंदोलक आज प्रमाणंच धैर्य आणि सहनशीलता उद्या देखील दाखवतील, असं वांगचुक म्हणाले.
Day #23
I'll continue my fast........... pic.twitter.com/rfohA8iMkx— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 20, 2026
आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज
कॉकरोज जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं होतं. आंदोलक मोठ्या संख्येनं संसदेकडे निघाले असताना अधिकाऱ्यांकडून पोलिसांनी सुरक्षा वाढवली. बॅरिकेड ओलांडून येण्याचा पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.
दरम्यान, सोनम वांगचुक यांना सोडण्यात यावं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि नीट यूजी परीक्षेमुळं आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची मदत देण्यात यावी, अशा तीन मागण्या सीजेपीनं केल्या आहेत.
मुंबईतही विद्यार्थ्यांचं आंदोलन
चैत्यभूमी येथे विविध विद्यार्थी संघटनांकडून आणि पक्षाकडून सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनातील काही आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. माहिम पोलीस स्टेशन मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार महेश सावंत त्यासोबतच नगरसेवक निशिकांत शिंदे या मुलांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी पोहोचले आहेत. ज्या मुलांना माहिम पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना सोडण्याची विनंती करण्यात येत आहे.














