मुंबई : दिल्लीसह राज्यभरात सुरू असलेल्या नीट परिक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरती आणि केंद्र सरकारच्या भुमिकेवरती ठाकरे गटाचे
प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की,आंदोलन शांततामय परिस्थितीत सुरू होतं, केंद्रातून त्या आंदोलकांवर दबाव आणला जात आहे, त्याचे परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात उमटत आहेत, भाजप जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी देखील अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. काँग्रेसच्या काळात जेव्हा आम्ही राजीनामे मागितले तेव्हा दिले गेले, आर आर पाटील यांचे कसाबच्या वक्तव्यामुळे त्यांचा ही राजीनामा घेण्यात आला होता. नीटचा पेपर पहिल्यांदा फुटला नव्हता ही तिसरी वेळ आहे. जेव्हा NEET परिक्षा सुरू केली तेव्हाच आम्ही विरोध केला होता. आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात होता. पण आता प्रश्न तिथपर्यंत राहिला नाही. आता ते पीएम पर्यंत गेला आहे. त्यांनी आज काही तरी ट्वीट केले आहे. आधीच जर त्यांच्यासोबत चर्चा केली असती तर हे झाले नसते. शिखांच आंदोलन झाले, त्यांच्याशी देखील बोलणे केले नाही. मणिपूर मध्ये देखील कोणतीही चर्चा केली नाही. ही कोणती सत्ता आणि हा कोणत्या सत्तेचा माज आहे, असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Uddhav Thackeray and Raj Thackeray: कुणाचंच ऐकत नाहीत, हा माज कसला?
मी आधी एकदा याच्याबोबत बोललो असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात मी म्हटले आहे की, आता शेतकरी आत्महत्या करत आहेत, नंतर विद्यार्थी आत्महत्या करतील, आता या घटनांनंतर प्रत्येक घरात त्रास होत आहे, शेतकऱ्यांचं आंदोलनही अशाच पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न झाला होता. हा सत्तेचा उद्दामपणा कशासाठी? कुणाचंच ऐकत नाहीत, हा माज कसला? मुद्दा प्रधानांपर्यंत नाही तर पंतप्रधानांपर्यंत गेला आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 26 जुलै रोजी आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढणार आहोत. प्रत्येक घरातील पालकांना हे सर्व बघून खूप त्रास होतोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की, येत्या रविवारी 26 जुलै रोजी ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत. २६ तारखेला आम्ही शक्ती प्रदर्शन मोर्चा आम्ही एकत्र करत आहोत. रविवारी २६ जुलै ला हा मोर्चा शिवतीर्थ पासून निघेल आणि सिद्धिविनायक पर्यंत जाईल. आम्ही देवाला साकडे घालणार आहोत की या सरकारला सद्बुद्धी मिळो असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तर सकाळी 11.30 वाजता मोर्चाला सुरूवात होणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
Uddhav Thackeray and Raj Thackeray: आपण आधी सिद्धिविनायकला साकडं घालू सरकारला सुबुद्धी दे
तर याप्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, हा विषय आता NEET पुरता राहिला नाही. एक व्यक्ती संजय राऊत यांना भेटला, तो माध्यम वयाचा होता, बिहारहून आला होता, तो राग व्यक्त करायला आला होता. गेल्या काही वर्षाचा राग आता उफाळून आला आहे. न्यायमूर्ती यांना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे बोलत आहे. मुलींना मारले गेले आहे. लाठ्या काठ्याने मारले गेले. खिळे लावून मारले कपडे फाडले. न्यायलयाला कुत्रे कबूतरे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे. हे ध्रुत राष्ट्र होऊ लागले आहे. मधल्या काळात चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. पीएम यांनी एक ट्वीट केले आहे पण त्यांनी जाऊन बोलायला हवे होते. ते जाऊन बोलले असते तर आंदोलन ताणले नसते. लोकांना आलेला राग व्यक्त केला जात आहे. आम्ही या आंदोलनाला वाट काढत आहोत. सिविल ड्रेसमधल्या गुंडांच्या हातात पोलिसांच्या काठ्या कश्या आल्या? हे आंदोलन मोडायला भाजपने पाकिस्तान मधून लोक आणली का? ही गुंडागर्दी सुरू असताना कोणी ही गप्प बसू नये. या रविवारी देशाची ताकद दाखविण्यासाठी एकत्र यायचं आहे, आपण आधी सिद्धिविनायकला साकडं घालू सरकारला सुबुद्धी दे नाही तर हे घालवं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर सीजीपी आणि विद्यार्थ्यांचं ऐकायला वेळ नाही असं सरन्यायधीशांनी म्हटलं पण हे सुरू केले ते त्यांनीच, सीजीपीला जन्माला यांनीच घातले आहे, असंही पुढे राज ठाकरे म्हणालेत. मुलींचे कपडे फाडडे, गुंडांच्या हातात लाठ्यकाठ्या कुठून आल्या, मग आता त्यांच्यावरती देखील कारवाई करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Uddhav Thackeray and Raj Thackeray:त्यालाच जंतर मंतर असं बोलतात...
तर शरद पवार हे सकाळी विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटले यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, त्यालाच जंतर मंतर असं बोलतात. तर पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवरती उद्धव ठाकरे म्हणाले, आता विषयाला फाटे फोडू नका. देशाच्या भविष्याची चिंता असेल तर त्यांनी तिथे चिंता व्यक्त केली असेल. त्याचबरोबर मुंबईत ठाकरेंच्या पक्षाकडून काढण्यात येत असलेल्या रविवारच्या आंदोलनात पवार साहेब येऊ शकतात, भाजपचे देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. आमच्या पक्षाचे तिथे झेंडे नसतील, ज्यांना विद्यार्थ्यांचं हीत चांगलं वाटतं. ते येऊ शकतात असंही पुढे राज ठाकरेंनी म्हटलं आहे, तर विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे आता कळेल असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे. आम्ही जे काही करणार आहोत, तिथे कोणत्याही पक्षाचे झेंडे नसतील, फक्त तिरंगा असेल. सकाळी १० वाजता आम्ही तिथे जमू. विद्यार्थ्यांसोबत आम्ही पालकांनी देखील यावे असे आवाहन करू असंही राज ठाकरे म्हणालेत. तर मी आताच जंतर मंतरला गेलो असतो पण माझी तब्येत बरी नव्हती असंही ते म्हणालेत.
तर पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझे राहुल गांधी यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले, सपकाळ यांच्यासोबत ही बोलणे केले आहे. मी दिल्लीला जाण्याआधी सोनम वांगचुक यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला होता, त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं, उपोषण सोड, हे सरकार निर्दयी आहे. या सरकारला संवेदना नाही. मागे गंगा नदीसाठी आंदोलन झाले, त्यावेळी आंदोलनकर्ते मृत्यू पावले आणि गंगा आणखी खराब झाली, कोरोना काळात तर त्या गंगेच्या पाण्यात मृतदेह वाहिले अशी माहिती देखील यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी दिली आहे. मी सरकारला नम्र विनंती करतो आहे की आंदोलकांना आणखी भडकवू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.













