Avengers Doomsday Hindi Trailer: अखेर प्रतीक्षा संपलीय, मार्वल स्टुडिओनं (Marvel Studios) त्यांच्या अत्यंत बहुप्रतिक्षित 'अॅव्हेंजर्स: डूम्सडे' () (Avengers:
Doomsday) या सिनेमाचा दमदार ट्रेलर (Avengers Doomsday Trailer) प्रदर्शित केलाय. सुमारे 4,500 कोटी रुपयांचं बजेट आणि 26 सुपरस्टार्सची फौज असलेल्या सिनेमात सुपरहिरोज एका अत्यंत शक्तिशाली खलनायकाचा सामना करताना दिसणार आहेत. या ट्रेलरवरून हे स्पष्ट होतंय की, यावेळी MCU (मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स) मध्ये मोठं 'क्रॉसओव्हर्स' (विविध पात्रांचे एकत्र येणे) पाहायला मिळणार आहेत. थॉर (Thor), कॅप्टन अमेरिका (Captain America), फॅन्टॅस्टिक फोर (Fantastic Four), ब्लॅक पँथर (Black Panther) आणि एक्स-मेन (X-Men) यांसारखी दिग्गज पात्र इतिहासातील सर्वात मोठ्या लढाईत एकत्र लढताना दिसणार आहेत. हा सिनेमा 18 डिसेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
'अॅव्हेंजर्स: डूम्सडे'चा ट्रेलर प्रदर्शित; रॉबर्ट डाउनी ज्युनियरचं MCU मध्ये पुनरागमन (Avengers Doomsday Trailer OUT)
मार्वल स्टुडिओनं या वर्षातील त्यांच्या सर्वात बहुप्रतिक्षित 'अॅव्हेंजर्स: डूम्सडे' (Avengers Doomsday) सिनेमाचा नवा ट्रेलर आणि पोस्टर सादर केलंय. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि उत्सुकतेनंतर आलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या (MCU) पुढच्या पर्वाची एक रोमांचक झलक दाखवतो.
सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, रॉबर्ट डाउनी ज्युनियरचं MCU मधील पुनरागमन. मात्र, यावेळी तो 'आयर्न मॅन'च्या भूमिकेत नाही, तर मार्वलच्या सर्वात धोकादायक खलनायकांपैकी एक असलेल्या 'डॉक्टर डूम'च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचं हे नवं रूप MCU च्या इतिहासातील सर्वात मोठ्या संघर्षाची नांदी ठरणार आहे.
अँथनी आणि जो रुसो यांचं दिग्दर्शन (Directed By Anthony And Joe Russo)
'ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर' आणि 'ॲव्हेंजर्स: एंडगेम' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन करणारे अँथनी आणि जो रुसो पुन्हा एकदा या मेगा-प्रोजेक्टचं दिग्दर्शन करत आहेत. 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे'मध्ये मार्व्हल युनिव्हर्सच्या विविध पिढ्यांमधील सुपरहिरो दिसणार आहेत, ज्यामुळे हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सिनेमॅटिक इव्हेंटपैकी एक ठरेल.
स्टीव्ह रॉजर्स (कॅप्टन अमेरिका) आणि थॉर सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर, लोकप्रिय एक्स-मेन पात्रं देखील या लढाईचा भाग असतील, पॅट्रिक स्टीवर्ट (प्रोफेसर एक्स), इयान मॅककेलन (मॅग्नेटो) आणि जेम्स मार्सडेन (सायक्लॉप्स) यांचं पुनरागमन होतंय. याव्यतिरिक्त, फॅन्टॅस्टिक फोर कथेमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
'एवेंजर्स: डूम्सडे' सिनेमाची स्टार कास्ट (Avengers: Doomsday Star Cast)
मार्व्हल स्टुडिओजच्या 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे'चं दिग्दर्शन अँथनी रुसो आणि जो रुसो यांनी केलंय. सिनेमाची निर्मिती केविन फीज, लुईस डी'एस्पोसिटो आणि जोनाथन श्वार्ट्झ यांनी केलीय. सिनेमात रॉबर्ट डाउनी ज्युनियर, ख्रिस इव्हान्स, ख्रिस हेम्सवर्थ, पेड्रो पास्कल, पॉल रड, अँथनी मॅकी, फ्लॉरेन्स प्यू, व्हॅनेसा किर्बी, एबॉन मॉस-बॅक्रॅक, वायट रसेल, चॅनिंग टॅटम, सिमू लिऊ, इयान मॅककेलन, टॉम हिडलस्टन, जेम्स मार्सडेन, पॅट्रिक स्टीवर्ट, जोसेफ क्विन, सेबॅस्टियन स्टॅन, डेव्हिड हार्बर, लेटिशिया राइट, लुईस पुलमन, केल्सी ग्रॅमर, कॅथरीन न्यूटन, डॅनी रॅमिरेझ, विन्स्टन ड्यूक, ॲलन कमिंग, हॅना जॉन-केमेन, रेबेका रोमिजन, मेबेल कॅडेना आणि टेनोच हुएर्टा मेजिया यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
'एवेंजर्स: डूम्सडे' कधी रिलीज होणार? (Avengers: Doomsday Released Date)
'एवेंजर्स: डूम्सडे'मध्ये ती वेगवेगळ्या युनिवर्सचे सुपरहिरो एका अशा दुश्मनाचा सामना करतील, जे त्यांच्या अस्तित्वासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका असतील. मार्वल स्टुजिओजचा 'एवेंजर्स: डूम्सडे' 18 डिसेंबर रोजी भारतभरातील थिएटर्समध्ये प्रिमियम फॉर्मेट्समध्ये रिलीज होणार आहे. ही फिल्म इंग्रजी, हिंदी, तमिल आणि तेलुगु भाषांमध्ये पाहता येणार आहे.
पाहा ट्रेलर : Avengers Doomsday Trailer
महत्त्वाच्या इतर बातम्या :
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर














