Jantar Mantar Protest Delhi: नीट (NEET Exam) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतर (Jantar Mantar) वर सुरू असलेल्या आंदोलनाला
आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janata Party) चे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्या नेतृत्वाखाली आज, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणांनी (Security Agencies) संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप दिले आहे.
सुरक्षेचे कारण पुढे करत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनपथ (Janpath), राजीव चौक (Rajiv Chowk), पटेल चौक (Patel Chowk), सेंट्रल सेक्रेटरीएट (Central Secretariat) आणि सेवा तीर्थ (Seva Teerth) ही महत्त्वाची पाच मेट्रो स्टेशन (Metro Stations Closed) पुढील आदेशापर्यंत प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद केली आहेत.
Jantar Mantar Protest Delhi: जंतरमंतरवर वज्र वाहन, वॉटर कॅनन अन् RAF चा फौजफाटा
गेल्या काही तासांपासून जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलीस (Delhi Police), रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी घटनास्थळी वॉटर कॅनन आणि दंगल नियंत्रण 'वज्र' वाहने तैनात करण्यात आली आहेत. शिवाय, संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर्स बसवून नेटवर्क ठप्प करण्यात आले आहे.
#WATCH | Delhi: Central Secretariat Metro Station closed for public in view of a proposed march to Parliament by CJP today, 20th July.
Delhi Metro Rail Corporation (DMRC) tweets, "Due to security reason, Janpath, Rajiv Chowk, Patel Chowk, Central Secretariat and Seva Teerth… pic.twitter.com/SOrlKvYaXp— ANI (@ANI) July 20, 2026
Jantar Mantar Protest Delhi: CCTV बंद अन् बॅरिकेड्स हटवले; बळाचा वापर होण्याची शक्यता?
विशेष म्हणजे, रविवारी रात्रीपासून जंतरमंतरवर पोलिसांच्या हालचालींना अचानक वेग आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले असून, तेथील बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. यापूर्वी या आंदोलनात 20 दिवस आमरण उपोषणाला बसलेले पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांना रविवारी पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतले आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यानंतर आता अभिजीत दिपके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले असून, पोलीस आणि लष्करी बळाचा वापर करून उर्वरित आंदोलकांनाही जंतरमंतरवरून पिटाळून लावले जाऊ शकते, अशी तीव्र शक्यता वर्तवली जात आहे.
Jantar Mantar Protest Delhi: आंदोलकांचा गंभीर आरोप
रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या या पोलीस कारवाईवर आंदोलकांनी गंभीर आरोप केले आहेत. "पोलीस प्रशासन आणि सरकार आंदोलकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. जंतरमंतरवर काहीही घडण्याची शक्यता आहे. परंतु, सर्वांना आवाहन आहे की, प्रत्येकाने अतिशय शांततेने आणि थंड डोक्याने वागावे. आजूबाजूला कोणीही संशयित किंवा समाजकंटक आढळल्यास त्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात द्या, संपूर्ण घटनेचे व्हिडिओ शुटिंग करा आणि एकमेकांची काळजी घ्या. आपण महिनाभरापासून शांततामय मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकार आता घाबरले आहे. त्यामुळे आता आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद मार्गावर निघणारा मोर्चा काढला जाऊ नये, हा सरकारचा प्रयत्न आहे, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार














