Cockroach Janata Party News : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा
मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आपल्या एका प्रमुख कार्यकर्त्यावर कारवाई केली आहे. सोमवारी काढलेल्या मोर्चादरम्यान, मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेलेले संघटनेचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर काढलेल्या मोर्चामुळे राजधानी दिल्लीसह देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच देशातील शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा हातात घेत आंदोलन सुरू करणाऱ्या अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर पाठिंबाही मिळत आहे. यादरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आपल्या एका प्रमुख कार्यकर्त्यावर कारवाई केली आहे. सोमवारी काढलेल्या मोर्चादरम्यान, मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेलेले संघटनेचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्यावर पक्षाने कारवाई करताना पक्षाने त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदींच्या घरासमोर राहुल गांधींचं आंदोलन सुरु
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि सरन्यायाधीशांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवरून सध्या दिल्लीचे राजकारण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 7, लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. प्रियांका गांधी आणि जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसचे अनेक खासदार त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासोबत राहुल गांधींशी बोलण्यासाठी आले होते. मात्र, आता ते दोघेही निघून गेले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर रात्रभर ठिय्या आंदोलन करतील.
गृहमंत्र्यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे : खासदार जयराम रमेश
काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची एक साधी मागणी आहे. आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये ही मागणी केली आहे. आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी संसदेत यावर स्पष्टीकरण द्यावे आणि या विषयावर संसदेत चर्चा व्हावी. लोकशाही आणि आपल्या संविधानाची कशी हत्या केली जात आहे आणि विद्यार्थ्यांचा कसा छळ केला जात आहे, यावर त्यांनी निवेदन द्यावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही गेल्या 45 दिवसांपासून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत असे जयराम रमेश म्हणाले.













