BBL 2026-27 Schedule Marathi News : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा (BBL) 16 वा सीझन लवकरच धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज, 14 जुलै रोजी बीबीएलकडून आगामी
2026-27 च्या हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यंदाच्या हंगामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या लीगचा सलामीचा सामना भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरून (MCG) याची घोषणा केली होती. यानुसार, बीबीएलचा पहिला थरारक सामना चेन्नईच्या ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) 12 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
12 डिसेंबरपासून BBL 2026-27 चा थरार
बिग बॅश लीग 2026-27 ची सुरुवात 12 डिसेंबरपासून होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात हा सलामीचा सामना रंगेल. या ऐतिहासिक सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाला होम टीमचा दर्जा देण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदाच बीबीएलचा सामना आयोजित केला जात असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
पंतप्रधानांनी मेलबर्नमध्ये केली होती घोषणा
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (MCG) भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज, माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि माजी महिला क्रिकेटपटू लिसा स्थालेकर उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत क्रिकेट संबंधांचे प्रतीक म्हणून या सामन्याकडे पाहिले जात आहे.
BBL 2026-27 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे -
| तारीख | सामना (Match) | वेळ (IST) |
| १२ डिसेंबर | मेलबर्न रेनेगेड्स vs पर्थ स्कॉर्चर्स (चेन्नई) | दुपारी २:४० |
| १५ डिसेंबर | ब्रिस्बेन हीट vs सिडनी सिक्सर्स | दुपारी १:४५ |
| १६ डिसेंबर | सिडनी थंडर vs अॅडलेड स्ट्रायव्हर्स | दुपारी १:४५ |
| १७ डिसेंबर | होबार्ट हरिकेन्स vs ब्रिस्बेन हीट | दुपारी १:४५ |
| १८ डिसेंबर | मेलबर्न स्टार्स vs अॅडलेड स्ट्रायव्हर्स | दुपारी १:४५ |
| १९ डिसेंबर | सिडनी थंडर vs सिडनी सिक्सर्स | दुपारी १:४५ |
| २० डिसेंबर | पर्थ स्कॉर्चर्स vs होबार्ट हरिकेन्स | दुपारी १:४५ |
| २१ डिसेंबर | मेलबर्न स्टार्स vs ब्रिस्बेन हीट | दुपारी १:४५ |
| २२ डिसेंबर | सिडनी सिक्सर्स vs मेलबर्न रेनेगेड्स | दुपारी १:४५ |
| २३ डिसेंबर | अॅडलेड स्ट्रायव्हर्स vs सिडनी थंडर | दुपारी १:४५ |
| २४ डिसेंबर | मेलबर्न रेनेगेड्स vs होबार्ट हरिकेन्स | दुपारी १:४५ |
| २६ डिसेंबर | सिडनी सिक्सर्स vs ब्रिस्बेन हीट | दुपारी १२:३५ |
| २६ डिसेंबर | पर्थ स्कॉर्चर्स vs मेलबर्न स्टार्स | दुपारी ३:४५ |
| २७ डिसेंबर | सिडनी थंडर vs मेलबर्न रेनेगेड्स | दुपारी १:४५ |
| २८ डिसेंबर | ब्रिस्बेन हीट vs अॅडलेड स्ट्रायव्हर्स | दुपारी १:४५ |
| २९ डिसेंबर | होबार्ट हरिकेन्स vs मेलबर्न स्टार्स | दुपारी १:४५ |
| ३० डिसेंबर | पर्थ स्कॉर्चर्स vs सिडनी थंडर | दुपारी १:४५ |
| ३१ डिसेंबर | अॅडलेड स्ट्रायव्हर्स vs मेलबर्न स्टार्स | दुपारी १:४५ |
| १ जानेवारी | मेलबर्न रेनेगेड्स vs सिडनी सिक्सर्स | सकाळी १०:३० |
| १ जानेवारी | ब्रिस्बेन हीट vs होबार्ट हरिकेन्स | दुपारी १:४५ |
| २ जानेवारी | सिडनी थंडर vs पर्थ स्कॉर्चर्स | दुपारी १:४५ |
| ३ जानेवारी | सिडनी सिक्सर्स vs अॅडलेड स्ट्रायव्हर्स | दुपारी १:४५ |
| ४ जानेवारी | मेलबर्न स्टार्स vs मेलबर्न रेनेगेड्स | दुपारी १२:३५ |
| ४ जानेवारी | पर्थ स्कॉर्चर्स vs ब्रिस्बेन हीट | दुपारी ३:४५ |
| ५ जानेवारी | होबार्ट हरिकेन्स vs सिडनी थंडर | दुपारी १:४५ |
| ६ जानेवारी | अॅडलेड स्ट्रायव्हर्स vs मेलबर्न रेनेगेड्स | दुपारी १:४५ |
| ७ जानेवारी | मेलबर्न स्टार्स vs सिडनी सिक्सर्स | दुपारी १:४५ |
| ८ जानेवारी | ब्रिस्बेन हीट vs पर्थ स्कॉर्चर्स | दुपारी १:४५ |
| ९ जानेवारी | होबार्ट हरिकेन्स vs अॅडलेड स्ट्रायव्हर्स | दुपारी १:४५ |
| १० जानेवारी | सिडनी सिक्सर्स vs पर्थ स्कॉर्चर्स | सकाळी ८:४० |
| १० जानेवारी | मेलबर्न रेनेगेड्स vs ब्रिस्बेन हीट | दुपारी १:४५ |
| ११ जानेवारी | सिडनी थंडर vs मेलबर्न स्टार्स | दुपारी १:४५ |
| १२ जानेवारी | अॅडलेड स्ट्रायव्हर्स vs होबार्ट हरिकेन्स | दुपारी १:४५ |
| १३ जानेवारी | पर्थ स्कॉर्चर्स vs मेलबर्न रेनेगेड्स | दुपारी १:४५ |
| १४ जानेवारी | मेलबर्न स्टार्स vs होबार्ट हरिकेन्स | दुपारी १:४५ |
| १५ जानेवारी | सिडनी सिक्सर्स vs सिडनी थंडर | दुपारी १:४५ |
| १६ जानेवारी | अॅडलेड स्ट्रायव्हर्स vs पर्थ स्कॉर्चर्स | सकाळी १०:३० |
| १६ जानेवारी | मेलबर्न रेनेगेड्स vs मेलबर्न स्टार्स | दुपारी १:४५ |
| १७ जानेवारी | होबार्ट हरिकेन्स vs सिडनी सिक्सर्स | सकाळी ८:१० |
| १७ जानेवारी | ब्रिस्बेन हीट vs सिडनी थंडर | दुपारी १:४५ |
हे ही वाचा -
FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वाला हादरवणारा सलग दुसरा मृत्यू! आधी 25 वर्षांचा स्टार गेला, आता FIFA विश्वचषकातून हकालपट्टी झालेल्या रेफरीचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?













