Sonam Wangchuk wife Gitanjali J Angmo: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना शनिवारी (18 जुलै) दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील (Jantar
Mantar) आंदोलन स्थळावरून खाली उतरवून सफदरजंग रुग्णालयात (Hospital) दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या आठव्या मजल्यावर दाखल करण्यात आले आहे. सर्वात वरच्या, म्हणजेच आठव्या मजल्यावर जाणारी लिफ्ट तिथे थांबू शकत नसल्याने ती बंद करण्यात आली आहे. हा मजला खाजगी खोल्यांसाठी राखीव असून तो दिल्ली पोलिसांच्या कडक देखरेखीखाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या पत्नी, गीतांजली आंगमो (Gitanjali J Angmo) सध्या रुग्णालयाबाहेर आहेत. रुग्णालयाबाहेर दोन बसमधून मोठ्या संख्येने सीआरपीएफचे जवान दाखल झाले आहेत. अशातच या सर्व घडामोडींवर बोलतां सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
Gitanjali J Angmo: सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंगमो यांनी शनिवारी (18 जुलै) दावा केला की, वांगचुक "पूर्णपणे ठीक" आहेत, परंतु वारंवार विनंती करूनही सफदरजंग रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय अहवालांच्या प्रती देत नाही. आंगमो यांनी असेही सांगितले की, 20 जुलै रोजी प्रस्तावित असलेला संसद मोर्चा ठरल्याप्रमाणे होईल आणि त्यात वांगचुक सहभागी होतील. आंगमो यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून कळवले आहे की, सोनम वांगचुक यांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही औषध किंवा वैद्यकीय उपचार देऊ नयेत. रुग्णालयात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची मागणीही केली.
Sonam Wangchuk News : कुटुंबीयांना आतमध्ये मोबाईल फोन नेण्याचीही परवानगी नाही
उपोषणाच्या 21 व्या दिवशी, शनिवारी सकाळी वांगचुक यांना जंतर मंतर येथून सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. त्यांनी रुग्णालयाबाहेरील मोठ्या पोलीस बंदोबस्तावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, कुटुंबीयांना आतमध्ये मोबाईल फोन नेण्याची परवानगी दिली जात नव्हती, ज्यामुळे त्यांना 'तुरुंगात' असल्यासारखे वाटत होते. आंगमो म्हणाले की, डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले की वांगचुक यांच्या पोटॅशियमची पातळी आदल्या दिवशीच्या 4.3 वरून 2.9 पर्यंत खाली आली होती, परंतु रुग्णालयाने वैद्यकीय अहवाल देण्यास नकार दिला, असा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
- Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...














