Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावरील आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांना रविवारी दिल्ली पोलिसांनी
(Delhi Police) बळाचा वापर करुन उचलून दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात नेले होते. यानंतर सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांनी सोमवारी सकाळी एक महत्त्वाचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सोनम वांगचूक यांनी काही अटींच्या मोबदल्यात आपले आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. या अटी आता केंद्र सरकार मान्य करणार का, हे बघावे लागेल. (Delhi Protest news)
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांच्या तीन अटी काय?
सोनम वांगचूक यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सोनम वांगचूक यांनी आपले आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी सोनम वांगचूक यांनी केंद्र सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.
1. केंद्र सरकारने नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी जबाबदारी घ्यावी.
2. जर मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.
3. जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.
हे सगळे मी मला अनधिकृत पद्धतीने ताब्यात ठेवण्यात आलेल्या सफदरगंज रुग्णालयातून सांगत आहे. याठिकाणी माझ्या हालचालींवर, बोलण्यावर आणि संपर्क साधण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
Delhi Protest: दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर प्रचंड बंदोबस्त तैनात
सोनम वांगचूक यांना रुग्णालयात उचलून नेल्यानंतर जंतरमंतर मैदानावरील आंदोलनातील हवा निघून जाईल, असे सरकारला वाटले होते. मात्र, अभिजीत दिपके हे स्वत: आमरण उपोषणाला बसले होते. तसेच सोनम वांगचूक यांना उचलून नेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढला होता. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. रविवारी मध्यरात्रीपासून जंतरमंतर परिसरात पोलिसांच्या हालचालींना वेग आला आङे. याठिकाणी वॉटर कॅनन आणि वज्र वाहन तैनात करण्यात आले आहे. दिल्ली पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवान याठिकाणी मोठ्याप्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. या भागात लावलेले बॅरिकेडस हटवण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरेही अचानक बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जंतरमंतरवरील आंदोलक प्रचंड सावध झाले आहेत.
दरम्यान, आज कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता अभिजीत दिपके आणि जंतरमंतरवरील आंदोलक काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण














