Ajit Pawar Birth Anniversary in Baramati: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल मध्यरात्री अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यानंतर बुधवारी सकाळी पवार कुटुंबीय अजित पवार यांचे विमान जिथे कोसळले त्या गोजुबावी गावातील धावपट्टीजवळ आले होते. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील, विजया पाटील हे सगळे कुटुंबीय याठिकाणी आले आणि त्यांनी अजितदादांना फुलं वाहत आदरांजली अर्पण केली. यावेळी अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार यांचा चेहरा अजितदादांच्या आठवणीने रडवेला झाला होता. त्यामुळे याठिकाणी भावूक वातावरण तयार झाले होते. (Ajit Pawar Birth Anniversary)
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना 28 जानेवारीला त्यांचा अपघात झाला होता. ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत येत असताना ही दुर्घटना घडली. बारामती विमानतळानजीक असलेल्या गोजुबावी (Gojubavi) गावाच्या हद्दीत अजित पवारांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळले होते. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानिक, केबिन क्रू आणि अजितदादांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबाबत घातपाताच्या शंका व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंतच्या चौकशीत तसे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
Sunetra Pawar: अजितदादांसाठी सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट
आणखी वाचा
Ajit Pawar and Sunetra Pawar: रात्री 12 वाजता सुनेत्रावहिनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या अन्...











