Delhi Protest Jantar Mantar : नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या 30 दिवसांपासून
दिल्लीच्या जंतरमंतर (Delhi Protest Jantar Mantar) मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी काल रात्रीपासून जंतरमंतरवर बॅरिकेडिंग करत अभिजीत दिपके (abhijeet dipke) यांच्यासह सर्व आंदोलकांना त्याच ठिकाणी अडकवून ठेवले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांचा एक वेगळा जमाव संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली आहे. यावर केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलकांनी हे आंदोलन थांबवावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे.
नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी सुरु असलेलं आदंलोन आंदोलकांना थांबवाव असं आवाहन जे पी नड्डा यांनी केलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी त्यांच्या मागण्या सरकारकडे दिल्या असल्याची माहिती जे पी नड्डा यांनी दिली आहे. शांततापूर्ण चर्चा झाल्याचे माहिती त्यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले जे पी नड्डा?
आंदोलन मागे घ्यावं, जनजिवन पुर्वरत करण्यासाठी पोलीसांना मदत करावी असे जे पी नड्डा म्हणाले. आंदोलकांकडून सरकारकडे चर्चेचा आज पहिला प्रस्ताव आला आहे. सकाळी 11.50 पासून आमची आंदोलाकांसोबत चर्चा सुरू आहे असे नड्डा म्हणाले. आंदोलकांसोबत बैठक पार पडली आहे. शिष्टमंडळासोबत व्यवस्थीत चर्चा झाली आहे असे नड्डा म्हणाले. आंदोलकांकडुन दुपारी 4 वाजता निवेदन देण्यात आले आहे असे नड्डा म्हणाले.
आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय?
1) सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करावी
2) धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा
3) आत्महत्या केलेल्या सर्व NEET परीक्षार्थींच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी
Delhi Protest Jantar Mantar: जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दोन तास वाट पाहायला लावली
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार सुरु असताना दुसर्या बाजूला सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्नही केला. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांना जे.पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दोन तास वाट पाहायला लावली आणि त्यानंतर फक्त 10 मिनिटांची भेट दिली, असे कॉकरोच पार्टीकडून सांगण्यात आले. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ट्विट करुन सर्व खासदारांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. पोलीस निर्घृणपणे आंदोलन मोडीत काढत आहेत आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांना मारत आहे, असेही सौरभ दास यांनी म्हटले.













