What is the story about?
Best Budget Hatchback Car: बजेट कार खरेदी करताना मायलेज, इंजिन क्षमता, फीचर्स आणि किंमत हे चार मुख्य घटक प्रत्येक ग्राहकासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात एंट्री लेव्हल मारुती सुझुकी अल्टो K10, रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) आणि टाटा टियागो (Tata Tiago) या तीन गाड्यांना मोठी मागणी आहे. तुम्हीही 5 ते 7 लाखांच्या बजेटमध्ये नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि या तिन्ही गाड्यांपैकी कोणती घ्यावी याबाबत गोंधळात असाल तर ही माहिती तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकते.
इंजिन आणि परफॉर्मन्स (Engine & Performance)
इंजिनच्या बाबतीत टाटा टियागोमध्ये सर्वात मोठे आणि शक्तिशाली इंजिन मिळते. टियागोमध्ये 1.2L इंजिन असल्यामुळे ती हायवेवर चालवताना अधिक दमदार आणि स्थिर वाटते. अल्टो K10 आणि क्विड शहरात रोजच्या प्रवासासाठी अत्यंत हलक्या आणि सुटसुटीत आहेत.
| कारचे नाव | इंजिन पर्याय | पॉवर (Power) | टॉर्क (Torque) |
| मारुती अल्टो K10 | 1.0 Litre K10C Petrol / CNG |
67 bhp | 89 Nm |
| रेनॉल्ट क्विड | 1.0 Litre SCe Petrol | 68 bhp | 91 Nm |
| टाटा टियागो | 1.2 Litre Revotron Petrol / CNG | 86 bhp | 113 Nm |
मायलेज तुलना (Mileage)
- मारुती अल्टो K10: इंधनाची बचत करण्याच्या बाबतीत मारुती अल्टो K10 अव्वल स्थानावर आहे. मारुती अल्टो K10 पेट्रोल इंजिन 24.39 किमी प्रतितास ते 24.90 किमी प्रतितास मायलेज देते. तर सीएनजी (CNG) 33.85 किमी प्रतिकिलो एवढे मायलेज देते.
- रेनॉल्ट क्विड: क्विडमध्ये पेट्रोल इंजिन 21.46 किमी प्रतिलिटर - 22.3 किमी प्रतिलिटर एवढे मायलेज देते. क्विडमध्ये कंपनी-फिटेड सीएनजी पर्याय उपलब्ध नाही
- टाटा टियागो: टियागोचा विचार केला तर ही गाडी देखील सीएनजी पर्यायासोबत येते. पेट्रोल व्हेरिएंट 19.01 किमी प्रतिलिटर ते 20.01 किमी प्रतिलिटर एवढे मायलेज देते. सीएनजी (CNG) व्हेरिएन्ट देखील 26.49 किमी प्रतिकिलो एवढं मायलेज देते.
हे ही वाचा...
टाटाची आगामी Avinya Electric SUV कॅमेऱ्यात कैद, बॅटरी आणि रेंजने वाढवली उत्सुकता
फीचर्स आणि केबिन (Features)
तीन्ही गाड्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे, पण क्विड आणि टियागोचे इंटीरियर अधिक प्रीमियम वाटते.
- मारुती अल्टो K10: या कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम Apple CarPlay आणि Android Auto, डिजिटल स्पीडोमीटर, 2 एअरबॅग्ज, ABS सह EBD, आणि रिअर पार्किंग सेन्सर्स मिळतात.
- रेनॉल्ट क्विड: या कारमध्ये 8-इंचचा मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, 184 मिमीचा सर्वोत्तम ग्राउंड क्लिअरन्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि स्पोर्टी लुक मिळतो.
- टाटा टियागो: या कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन बाय हर्मन साउंड सिस्टम 8 स्पीकर्ससह मिळतो. याशिवाय ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळते. सीएनजी व्हेरियंटमध्ये ड्युअल-सिलेंडर टेक्नॉलॉजीमुळे बूट स्पेस जास्त मिळते.
सुरक्षितता (Safety & Build Quality)
- टाटा टियागो: सुरक्षिततेचा विचार केल्यास टाटा टियागो ही या तिन्ही गाड्यांमध्ये सर्वात सुरक्षित कार मानली जाते. टाटा टियागोमध्ये ग्लोबल NCAP कडून 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. तिची बिल्ड क्वालिटी अत्यंत मजबूत आहे.
- अल्टो K10 आणि क्विड: या दोन्ही गाड्यांमध्ये सर्व मूलभूत सेफ्टी फीचर्स (ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स) मिळतात, परंतु क्रॅश टेस्ट रेटिंगच्या बाबतीत टियागो यांच्या पुढे आहे.
किंमत (Price Range - Ex-showroom)
| कार | सुरुवातीची किंमत | टॉप मॉडेलची किंमत |
| मारुती अल्टो K10 | 3.99 लाख रुपये | 5.96 लाख रुपये |
| रेनॉल्ट क्विड | 4.70 लाख रुपये | 6.45 लाख रुपये |
| टाटा टियागो | 5.65 लाख रुपये | 8.90 लाख रुपये |
हे ही वाचा...
कार प्रेमींनो थोडे थांबा! 'Skoda Slavia' नव्या अवतारात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज














