What is the story about?
Abhijeet Dipke Ends Hunger Strike: नीट (NEET) परीक्षेतील कथित अनियमितता आणि त्यामुळे उद्भवलेल्या वादामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंच्या विरोधात
दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता मोठे यश येताना दिसत आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आग्रहास्तव आज आपले उपोषण मागे घेतले आहे. दुसरीकडे, तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी मात्र रुग्णालयातूनच आपले अन्नत्याग आंदोलन ठामपणे सुरू ठेवले आहे. दरम्यान, दिल्लीत वाढता जनक्षोभ पाहता केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी चर्चेची दारं उघडली असून चर्चेसाठी निमंत्रण पाठवले आहे.
सरकारकडून चर्चेची पहिली वेळ
21 दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर 18 जुलै रोजी अभिजीत दीपके यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. मात्र, वांगचुक यांच्या विनंतीवरून त्यांनी आज आपले उपोषण मागे घेतले आहे.
एकीकडे जंतर-मंतरवर सीजेपीचे कार्यकर्ते आणि हजारो तरुण विद्यार्थी परीक्षा सुधारणांच्या प्रमुख मागणीसाठी मोठ्या संख्येने एकवटले असतानाच, सोमवारी केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यात चर्चेची पहिली फेरी पार पडण्यासाठी पावले उचलली गेली.
जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी प्रतिनिधी रवाना
केंद्र सरकारकडून चर्चेचे आमंत्रण आल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.
सौरभ दास यांनी आपल्या अधिकृत एक्स (X) हँडलवर सकाळी 11:52 वाजता ही माहिती शेअर करताना लिहिले की, "सकाळी 11:52 वाजले आहेत. आशुतोष रांका आणि मी, कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने जे.पी. नड्डा यांना भेटण्यासाठी जात आहोत. सरकारने सकाळीच चर्चेसाठी संपर्क साधला होता. आमच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आहेत. युवा वर्ग खूप मोठ्या संख्येने एकत्र आला आहे. विजय आपलाच होईल!"
हे ही वाचा...
CJP Morcha in Delhi: दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उग्र रूप; संसदेवर मोर्चा, पोलिसांचा लाठीचार्ज! नेमकं काय घडतंय?














